राजीव सातव यांचं निधन, हुशार सहकारी गमावला: राहुल गांधी

Update: 2021-05-16 06:28 GMT

काँग्रेस खासदार आणि गांधी घराण्याशी एकनिष्ट असणाऱ्या राजीव सातव यांचं आज पुण्यात निधन झालं. त्यांना कोरोना झाला होता. मात्र, कोरोनातून बरं झाल्यानंतर त्यांना काही आजार झाले होते. त्या आजारांशी त्यांची झुंज अपयशी ठरली. या संदर्भात कॉंग्रेस पक्षाकडून अधिकृत ट्वीट करण्यात आलं असून राज्य आणि केंद्रातील कॉंग्रेस नेत्यांनी राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांना 22 एप्रिलला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. सातव यांची प्रकृती खालावल्याचं समजताच राहुल गांधी यांनी तात्काळ डॉक्टरांशी फोनवरून चर्चा केली. राहुल गांधी यांनी जवळ जवळ अर्धा तास डॉक्टरांशी बातचीत केली होती.

विशेष म्हणजे मुंबईच्या लीलावती रुग्णालयातील एक टीम त्यांच्या उपचारासाठी थेट पुण्याला गेली होती. राजीव सातव हे गुजरातचे प्रभारी होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते राहुल गांधींच्या अत्यंत विश्वासू व्यक्तीपैकी एक व्यक्ती मानले जायचे.

सातव यांच्या निधनानंतर राहुल गांधी यांनी ज्या शब्दांत ट्वीट केलं आहे. त्यावरुन त्यांची जवळीक लक्षात येते. राहुल गांधी आपल्या ट्वीट मध्ये म्हणतात... "राजीव सातव यांच्या निधनानं मला खूप दु:ख झालं आहे. ते खूप ताकदीचे नेते होते. हा आमच्या सगळ्यांसाठी खूप मोठा धक्का आहे."



Tags:    

Similar News