काँग्रेसला मोठं खिंडार, 28 नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Update: 2022-01-27 11:29 GMT

कॉंग्रेसपक्षातील गळती सुरुच आहे.गेल्या आठवड्यात पार पडलेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीत कॉंग्रेसला फारसं यश मिळालेलं नसताना मालेगावात कॉंग्रेसला खिंडार पडलेल दिसतयं.काँग्रेस पक्षाच्या २८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत पक्षात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसच्या जिल्हा पातळीच्या धोरणांवर कार्यकर्ते नाराज झालेले दिसत आहेत.

मालेगावात काँग्रेसला मोठं खिंडार पडलं आहे. मालेगावातील काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. राष्ट्रवादी बदनाम होणार नाही, पक्षाला गालबोट लागणार नाही आणि जनतेच्या मनात चुकीची भावना निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या, अशा सूचना अजित पवार यांनी या सर्व नगरसेवकांना दिल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र सत्तेत असले तरी या तिन्ही पक्षात पक्षवाढीसाठी एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत आहेत.

आगामी मार्च-एप्रिल महिन्यात राज्यातील काही जिल्ह्याच्या महाहालिका निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे.एकीकडे निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असताना दुसरीकडे पक्षांतर होण्याचं काम सुरु आहे.

Tags:    

Similar News