फडणवीसांसाठी ठाकरे ताटकळले

Update: 2020-02-27 07:24 GMT

मराठी भाषा दिना निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. विधानभवनात देखील मराठी भाषा दिवस साजरा केला गेला. त्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कार्यक्रमाच्या वेळेप्रमाणे सकाळी साडे दहा वाजता विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हजर झाले.

पण यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाविकास आघाडीतील काही मंत्री कार्यक्रम स्थळी पोहोचलेले नव्हते. त्यामुळं उद्धव ठाकरे यांना १० मिनिटं ताटकळत वाट पाहावी लागली. यावर माजी मंत्री दिवाकर रावते यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.

'आम्ही मंत्री असताना असे कधी घडले नाही. मुख्यमंत्र्यांना इतर मंत्र्यांची वाट पाहत ताटकळत उभं रहावं लागतंय', असं म्हणत रावते यांनी आपली नाराजी व्यक्त केली. विरोधी पक्षनेते आणि महाविकास आघाडीतील मंत्र्यांना यायला उशीर झाल्याने मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम सुरू होण्यास उशीरही झाला.

Similar News