उद्धव ठाकरे आज मोदी भेटीला: राज्याच्या प्रलंबित प्रश्नांची होणार चर्चा

Update: 2021-06-08 03:10 GMT

महाराष्ट्रातील दुसऱ्या कोरोना लाटेचा संसर्ग कमी होत असताना अनलॉकच्या प्रक्रियांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील महत्वाच्या नेत्यांच्या शिष्ठमंडळ आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटीसाठी दाखल होणार आहे या निमित्ताने राज्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील अशी अपेक्षा आहे.

एका बाजूला कोरोना विरोधातील लढाई सुरू असताना राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि पदोन्नतीच्या आरक्षणावरुन राज्यात खळबळ सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचा या बैठकीत मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा करुन केंद्राचं सहकार्य मागितलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. असा असे CM Uddhav Thackrey यांचा दिल्ली दौऱ्याचा कार्यक्रम 

सकाळी सात वाजता मुख्यमंत्री विमानाने y.kinnnaq राज्य सरकारने मराठा समाजाला EWS (Economic Weaker Section) अंतर्गत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

एकीकडे राज्य सरकार मराठा आरक्षणासंदर्भात प्रयत्न करत असताना...मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. ६ जून ला शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमीत्ताने खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकार आता कसा हाताळतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याव्यतिरीक्त महाराष्ट्राला केंद्राकडून मिळणारा जीएसटीच्या परताव्याचा मुद्दाही उद्याच्या चर्चेत येण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची भेट राजकीय दृष्ट्या देखील महत्त्वाची मानली जात आहे.

Full View
Tags:    

Similar News