मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नोकरदार, पाहा किती आहे संपत्ती?

Update: 2020-05-11 17:42 GMT

ठाकरे कुटुंबाच्या संपत्ती बाबत विरोधक नेहमीच चर्चा करत असतात. आत्तापर्यंत ठाकरे कुटुंबाची संपत्ती जगासमोर आली नव्हती. आदित्य ठाकरे यांनी विधानसभेचा अर्ज दाखल केला असताना त्यांची संपत्ती समोर आली होती. मात्र, आता स्वत: उद्धव ठाकरे विधानपरिषदेच्या निवडणूकीच्या रिंगणात उतरल्यानं त्यांची संपत्ती अखेर जगासमोर आली आहे. अलिकडे उद्धव ठाकरे यांची संपत्ती अधिक असेल असा अंदाज लावला जात होता. मात्र, ही संपत्ती आश्चर्य चकीत करणारी नाही.

उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची संपत्ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा जास्त आहे. आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्या Join अकाउंट मध्ये अधिक पैसे आहेत. विशेष बाब म्हणजे मातोश्री बंगला अजुनही बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावावर आहे. रश्मी ठाकरे यांना सरकारी एजन्सीकडून 26 हजार रुपये येणं बाकी आहे.

विशेष बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या उत्पन्नाचा स्त्रोत हा नोकरी दाखवला आहे. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गुन्हेबाबत देखील या प्रतिज्ञापत्रात माहिती देण्यात आलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावरील सर्व खाजगी गुन्हे आहेत. त्यातील बहुतांश प्रकरण सामना मधील प्रक्षोपक लेखांबाबत असून काही गुन्हे प्रक्षोपक भाषणांबाबत अशा स्वरुपाचे आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. यामध्ये शेतजमीन, त्यांच्या बंगल्याची किंमत आणि दागिन्यांचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी 'या' PDF लिंकवर क्लीक करा

null

null

 

 

 

Similar News