नोकरभरती कधी? मुख्यमंत्र्यांच्या प्रत्येक पोस्ट वर नेटकऱ्यांचा एकच सवाल

गद्दारांकडे बघायला वेळ आहे पण, महाराष्ट्रातील बेरोजगारीकडे पहायला वेळ नाही. मुख्यमंत्री शिंदे कार्यावर युवापिढी नाराज. नेटकऱ्यांचा शिंदे-फडणवीसांना सल्ले.

Update: 2023-05-25 06:42 GMT

दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम हे काही दिवसांपूर्वी आजारी होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती सुधारल्यानंतर त्यांना आता घरी सोडण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतील आणि तब्बेतीची विचारपूस केल्याचं ट्विटही केलं. या भेटीवर नेटकऱ्यांनी मुख्यंमत्र्यासह गद्दारी करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारला जोरदार ट्रोल केलं आहे.




 


मुख्यमंत्र्यांनी आ. योगेश कदम यांच्या भेटीची माहिती ट्वि्टर द्वारे दिली ते म्हणाले आ. कदम यांच्यी "निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांना प्रकृतीची काळजी घेऊन लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे, आणि पुन्हा एकदा त्याच जोमाने लोकसेवेसाठी कार्यरत व्हावे" असा सल्ला मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे. या सल्ल्यावर लोकसेवा म्हणजे काय? असा सवालही एका नेटकऱ्याने विचारला आहे.

काय म्हणतायंत नेटकरी?

महेश कोष्टी (Mahesh Koshti) यांनी प्रतिक्रीया देत म्हणाले "गद्दाराला गद्दाराकडे बघायला वेळ आहे पण महाराष्ट्रातील बेरोजगारीवर बघायला वेळ नाही फसवे सरकारी रिक्त पदे कधी भरणार"

विनायक (vinayak)नावाच्या व्यक्तीने कदम यांच्या घरासंदर्भात प्रतिक्रीया दिली आहे ते म्हणाले

"दापोलीच्या मतदारांनो पाहताय ना!

आपल्या आमदार साहेबांचं घरकुल अवास योजनेतील घर, तुम्ही आयुष्यभर पुर पाऊस यांच्या सोबत संघर्ष करा. हे साहेब येतील मतं मागायला आणि जातील परत बंगल्यात राहायला. ५० खोके कितव्या मजल्यावर आहेत तुम्हीच बघा. आणि म्हणे उध्दव ठाकरेनी आम्हाला काय दिलं?"

शशी सरवाडे (shashi sarwade) अनुदानित उच्चमाध्यमिक शिक्षकाच्या वाढीव पदा ला मान्यता मिळवुन् द्या साहेब 15 वर्ष झाली विनावेतन काम करतोय .का अन्याय होतो. किती सहन करावे.मरण यातना भोगतोय शिक्षक ,बिनपगारी कस जगतोय

विचारा , साहेब आपण आलात तेव्हापासून आशा वाढली होती आता नकीच मान्यता मिळेल पण नाही का? टाळाटाळ का"

गजानन(gajanan) नावाच्या व्यक्तिने "प्रकृतीची विचारपूस करायला गेले की एका गद्दाराला मंत्री बनणार आहे म्हणून निरोप द्यायला गेले: असा सवाल विचारला आहे.


तर दिगविजय शेळके यांनी प्रतिक्रीया देत म्हणाले "भीला आहे असे दिसते..... म्हणजे पुन्हा निवडून येत नाय काय....एकदा दोघे बाप लेक मिळून रडा"

विराज जोशी (viraj joshi) मुख्यमंत्र्याना टॅग करत हे म्हणाले "@mieknathshinde

अशा गप्पा मारणायतच संपतय बग हे सरकार"

अदिनाथ चराटे Aadinath Charate यांनी "साहेब नोकर भरती प्रक्रिया सुरू करा 😭😭,खूप मनापासुन विनंती आहे साहेब.... गरिबांच सरकार म्हणता, सामान्य जनतेचे सरकार म्हणता....आम्ही गरीब-सामान्य दोन्ही आहोत....बघा वेळ असेल तर आमच्याकडे पण, नका असे आमच्या भावनासोबत खेळू 🙏😭.... साहेब लक्ष द्या हीच विनंती 🙏" मुख्यमंत्र्याना सल्ला दिला आहे.

सँडी नाईक (Sandy Nikam) हे म्हणालेत "शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकायला, त्यांना मदत करायला वेळ नाही परंतु बिन कामाच्या आमदाराला भेटायला वेळ आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्रीला" अशा पध्दतीत सुनावले आहे.





 


एकंदरी लोकांची नाराजी आजही शिंदे गटावर असल्याचं दिसून येत. अनेक नेटकऱ्यांनी त्यांना कामाविषयी सल्ला देत ट्रोल केलं आहे. फक्त भेटीगाठीचे फोटो नको तर नोकर भरती केंव्हा करणार असा सवालही या नेटकऱ्यांनी सरकारला विचारला आहे.

Tags:    

Similar News