मुख्यमंत्र्यांचा जिल्हाधिकाऱ्यांना थेट फोन, पूरग्रस्त भागात मदतीचे आदेश

Update: 2022-07-09 14:35 GMT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दिल्लीमध्ये राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेट घेत आहेत. पण त्याच बरोबर राज्यातील पूर परिस्थितीवरही मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे. विधिमंडळातील आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी आपण थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन आदेश देणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे आता त्यांनी दिल्लीतून थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन करुन पूर परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहेत. नदीला पूर आल्यामुळे कुरुंदा नावाचे एक गाव पाण्याखाली गेले आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी दिल्लीवरून हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावून संवाद साधला आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची राहाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. तसेच पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना केली.


Full View

Tags:    

Similar News