CAA : नमाजच्या अगोदर उत्तर प्रदेशात अलर्ट, १५ शहरांमध्ये इंटरनेटवर बंदी तर लखनऊमध्ये SMS वर बंदी

Update: 2019-12-27 07:05 GMT

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात देशभर निदर्शनं सुरू आहेत. आज शुक्रवार असल्यानं मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात नमाजासाठी बाहेर पडतील. या पार्श्वभूमीवर तसंच उत्तर प्रदेश मध्ये होणा-या निदर्शनांची पार्श्वभूमी लक्षात घेता, कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसंच अनेक शहरांमध्ये इंटरनेटवर देखील बंदी घालण्यात आलेली आहे.

गेल्या शुक्रवारी उत्तर प्रदेशातील बऱ्याच शहरांमध्ये हिंसक निदर्शनं करण्यात आली होती. म्हणून उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये हाय अलर्ट लागू करण्यात आहे. तसंच आधीपासुनच उत्तर प्रदेशामध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.

Similar News