चिपी विमानतळ उद्घाटन: नारायण राणे विनामास्क मंचावर...

Update: 2021-10-09 08:08 GMT

आज चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह केंद्रीय वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील मंचावर उपस्थित आहेत.

या कार्यक्रमाचं वैशिष्ट म्हणजे एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि नारायण राणे आज कार्यक्रमाच्या निमित्ताने तब्बल 16 वर्षांनी एकाच मंचावर पाहायला मिळत आहेत. मंचावर उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवारसह राज्यातील अनेक नेते उपस्थित आहेत.

कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम पार पडत आहे. त्यामुळं सर्व नेत्यांनी तोंडाला मास्क लावला आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मास्क लावलेला नाही. त्यामुळे बाकी मंत्र्यांना वेगळा नियम आणि नारायण राणे यांना वेगळा नियम आहे का? असा सवाल उपस्थित होतो.

Tags:    

Similar News