"चीनने भारताचा भूभाग बळकावला आहे का?"

Update: 2020-06-23 04:54 GMT

भारत आणि चीन दरम्यान सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गेल्या काही दिवसात जोरदार टीका सुरू केली आहे. नरेंद्र मोदी हे सरेंडर मोदी आहेत या शब्दात टीका केल्यानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला एक सवाल विचारला आहे.

राहुल गांधी यांनी आज केलेल्या ट्विटमध्ये "चीनच्या आक्रमणाविरोधात आम्ही एकत्रितपणे उभे राहू पण चीनने भारताचा भूभाग बळकावला आहे का?" असा सवाल सरकारला विचारला आहे. यात ट्विट बरोबर राहुल गांधी यांनी दिवंगत राजीव गांधी यांनी काढलेला लडाखमधील एक फोटो देखील ट्विट केलेला आहे. भारताच्या हद्दीत चीनने घुसखोरी केली नसल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर राहुल गांधी यांनी सोमवारी पुन्हा एकदा मोदींवर टीका केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनपुढे शरणागती पत्करल्याचा आरोप राहुल गांधी यांनी याप्रकरणी केला होता. त्यानंतर भाजप आणि काँग्रेस दरम्यान आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. लडाखमधील गलवानमध्ये भारत आणि चीन दरम्यान झालेल्या संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झालेले आहेत.

तर चीनचे 43 सैनिक शहीद झालेत असं वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिलेले आहे. या पार्श्वभूमीवर भारत आणि चीन दरम्यान तणाव निर्माण झालेला आहे. सर्वपक्षीय बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात चीनने घुसखोरी केली नसल्याचे म्हटल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदींवर सातत्याने टीका सुरू केली आहे.

Similar News