मुख्यमंत्र्यांचा ताप वाढला - बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

Update: 2023-08-15 04:13 GMT

गेल्या आठवड्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आजारी असल्याचं बोललं जात आहे. यावर उबाठा गटाने मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावरचं प्रश्न उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद कधीही जाऊ शकतं म्हणून ते आजारी पडले असल्याचं उबाठा गटांनं म्हटलं आहे. या मुद्द्यावर आता आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरंच आजारी आहे, म्हणून ते गावी गेले असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितले आहे.

बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खूप आजारी आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलो असता त्यांचा ताप १०३ पर्यंत गेला होता" असही बच्चू कडू म्हणाले .

ते पुढे म्हणाले की "सातत्याने काम करत असल्याने धावपळ आणि दगदगीतून हे आजारपण आलं असावं. नेतृत्त्व बदलासाठी आजारपण घेण्याची गरज नाही. मात्र, त्यांच्या आजारपणामुळं नेतृत्व बदललं जाणार नाही. 2024 पर्यंत राज्याच्या राजकारणात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही, असा आमचा ठाम विश्वास असल्याचंही बच्चू कडू म्हणाले.

Tags:    

Similar News