मुख्यमंत्र्यांचा उमेदवारी धोक्यात; काँग्रेसची राष्ट्रपतींकडे सरकार बरखास्तीची मागणी

Update: 2019-10-05 11:38 GMT

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाची नोटरी संपलेली असल्या कारणाने त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.

काँग्रेसने यावर आक्षेप घेत सरकार बरखास्तीची मागणी केली आहे.

दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभेचे उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उमेदवारी अर्जाचा निषेध केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या अर्जात नोटरी लावलेली आहेत ती नोटरी इनव्हॅलिड आहे.

ज्या वकिलाकडून ती मोठी करण्यात आलेली आहे त्या वकिलाचा कार्यकाळात डिसेंबर २०१८ पर्यंत होता. मुख्यमंत्र्यांनी चुकीची माहिती दिलेली आहे आणि

‘पिपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट’नुसार देवेंद्र फडणवीस यांचा अर्ज बाद झालाच पाहिजे

अशी मागणी काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांनी केलीय. यासोबत

निवडणूक निर्णय अधिकारी महाराष्ट्र सरकारचे कर्मचारी असल्यामुळे त्यांच्यावर दबाव असू शकतो.

त्यामुळे राज्यात निःपक्षपाती निवडणुका होण्यासाठी महाराष्ट्रातलं सरकार बसखास्त करावं अशी राष्ट्रपतींना विनंती करणार असल्याचं देशमुख म्हणाले.

Full View

Similar News