चंद्राजवळ पोहोचले चंद्रयान ३, इस्त्रो ने सांगितली सद्यस्थिती

Update: 2023-07-25 14:54 GMT

भारतानं अवकाशात सोडलेलं मिशन चंद्रयान आपल्या ध्येयाच्या दिशेनं पुढे जात आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रो ने चंद्रयान-३ संदर्भात महत्त्वाची माहिती दिलीय. मंगळवारी चंद्रयान-३ ने आणखी एक टप्पा पार केलाय. इस्त्रो ने पुन्हा एकदा कक्षा बदलाची प्रक्रिया (Earthbound Firing) यशस्वीरित्या पूर्ण करून चंद्रयान-३ ला पृथ्वीच्या पाचव्या आणि शेवटच्या कक्षेत पाठवलंय. १ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटांमनी इस्त्रो चंद्रयान-३ ला चंद्राच्या कक्षेत रवाना करेल, असी माहिती इस्त्रो ने ट्विटद्वारे दिलीय.

२३ ऑगस्टला केली जाणार सॉफ्ट लँडिंग

इस्त्रो ने ट्विट करत सांगितले की, बंगळुरूमधून चंद्रयान-३ ला पृथ्वीच्या पाचव्या कक्षेत पाठवण्यात आलंय. २५ जुलै रोजी दुपारी २ ते ३ च्या मध्ये चंद्रयान-३ च्या कक्षेला यशस्वीरित्या बदलण्यात आलंय. त्यानंतर आता हे चंद्रयान-३ चंद्राच्या कक्षेत पोहोचून त्याभोवती फिरायला सुरूवात करणार आहे. जमिनीवर भ्रमण करणारा चंद्रयान-३ चंद्राच्या ऑर्बिट मध्ये प्रवेश करेल. चंद्रापर्यंत पोहोचण्यासाठीही पाच मैनूवर असतील. भ्रमण करत लैंडर मॉड्यूल २३ ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल. या मोहीमेतील हाच सर्वात कठीण टप्पा असेल. या दरम्यान सॉफ्ट लैंडिंगचा प्रयत्न इस्त्रो कडून केला जाणार आहे.

१४ जुलै २०२३ रोजी इस्त्रो ने आंध्र प्रदेशमधील श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्र इथून चंद्र अन्वेषण कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीला यशस्वीरित्या लॉन्च करण्यात आलं होतं. या मोहीमेचा उद्देश हा चंद्रावर यानाचं सॉफ्ट लैंडिंग करणं असून त्यात चंद्राचे दुर्मिळ फोटो आणि माहिती प्राप्त करणं हा असल्याचं इस्त्रो ने स्पष्ट केलंय.


Tags:    

Similar News