चंद्रावर विक्रम लँडर सुस्थितीत, काय म्हटलंय इस्त्रोनं...

Update: 2019-09-09 11:54 GMT

भारताचं विज्ञानक्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी म्हणून चांद्रयान-२ मोहिमेकडे पाहिले जाते. चांद्रयान-२ मोहिमेतील संपर्क तुटलेले ‘विक्रम लँडर’ चंद्राच्या पृष्ठभागापासून फक्त २.१ किलोमीटर अंतरावर असताना लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. मात्र, त्याच्याशी संपर्क प्रस्थापित करण्याचे प्रयत्न भारतीय अवकाश संशोधन (इस्रो) शास्त्रज्ञ करीत आहेत.

संपर्क तुटलेल्या विक्रम लँडरचा ठावठिकाणा लागला असून, ऑर्बिटरने लँडरची थर्मल छायाचित्रेही टिपली आहेत, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली होती.

दरम्यान लँडर सापडला असला तरी त्याच्याशी अजून संपर्क होऊ शकलेला नसून पुढचे १४ दिवस संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. हा संपूर्ण लँडर एक असून लँडिंग करताना लँडरचे तुकडे झालेले नाहीत. अशी माहिती इस्रोच्या अधिकाऱ्याने दिली आहे. या संदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिले आहे. हार्ड लँडिंग करताना लँडरचे काहीही नुकसान झाले नाही अशी माहिती इस्रोच्या प्रमुखांनी दिली आहे.

Similar News