महावितरणला बावनकुळेनी मरणपंथाला नेले - डॉ नितीन राऊत यांची टीका

वीज दरवाढ आणि महावितरण कंपनीच्या आर्थिक स्थितीवरून माझी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि विद्यमान ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्यामध्ये वाद वाढतच असून आता डॉक्टर राऊत यांनी महावितरणला मरणपंथावर नेल्याचा आरोप केला आहे.

Update: 2020-11-23 15:55 GMT

माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज प्रतिकात्मक चितेवर वीजबिलांना अग्नी दिल्याचे दृश्य मी टीव्हीवर बघितले. चितेला अग्नी देण्याचा अधिकार वारसालाच असतो आणि महावितरणच्या आजच्या स्थितीचे खरे 'वारस' चंद्रशेखर बावनकुळे हेच आहेत. ऊर्जा खात्यातील महावितरण त्यांच्याच कार्यकाळात मरणपंथाला लागली. त्यामुळे वीजबिलाच्या प्रतिकात्मक चितेला त्यांनी अग्नी देणे संयुक्तिक होते.

त्यांनी महावितरणला रूग्णशय्येवर नेले असले तरी आम्ही त्याला वाऱ्यावर सोडणार नाही. महावितरणच्या आजारावर उपचार आम्हीच करू. त्याला नवसंजीवनी देऊ. महावितरण पुन्हा धडधाकट करणे हेच आमचे पहिले प्राधान्य राहणार आहे.

Full View

Tags:    

Similar News