चंद्रपूर-गडचिरोलीतील दारुबंदी उठवा: वड्डेटीवार यांची मागणी

Update: 2020-09-07 05:58 GMT

चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्यातील दारुबंदी उठवण्याची मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी केली आहे. त्यांच्या मते जिल्ह्यातील दारुबंदी पुर्णपणे फसली आहे. त्यामुळे माझी आग्रही मागणी आहे. की, जिल्ह्यातील दारुबंदी उठावी. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी देखील उठवावी. अशी मागणी मी कॅबिनेट पुढं केली आहे.

दारुबंदी काळात गुन्हेगारीत वाढ झाल्याची कबुली देखील त्यांनी यावेळी दिली. आज आणि उद्या अधिवेशन संपल्यानंतर उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, (dilip walse patil) गृहमंत्री अनिल देशमुख (anil deshmukh) यांच्या सोबत बैठक घेऊन हा प्रस्ताव कॅबिनेट मध्ये आणण्याचा विचार होईल. कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांचा या प्रस्तावाला पाठींबा असल्याचं वड्डेटीवार यांनी मॅक्समहाराष्ट्र शी बोलताना सांगितलं.

दरम्यान व़ड्डेटीवार यांच्या मागणीला अनेक सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे. त्यामुळं हा प्रस्ताव कॅबिनेट पुढं येणार का? आणि मंत्रीमंडळ यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं आहे.

 

Full View

Similar News