चंद्रकांत पाटलांना मिळाली अनोखी भेट

Update: 2019-11-04 13:39 GMT

 

महाराष्ट्रातील सर्वच राजकीय नेते सध्या शेतकऱ्यांच्या बांधावर आहेत. पुरंदर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे देखील योगायोगाने त्याच भागात पाहणी करत होते. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी शेतातील नासलेल पिक आणि फळांचा गुच्छ पाटलांना देऊन त्यांच्यासमोर शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.

परतीच्या पावसामुळे पुरंदरमध्ये पेरु. वाटाणा आणि भातशेतीचं मोठ्या प्रमाणात झाल आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला नाही त्यांना देखील भरपाई मिळणार आहे. येत्या ६ नोव्हेंबर पर्यंत पुर्ण पंचनामे होतील अस मत चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केल आहे.

Similar News