प्रियंका गांधी यांना एका महिन्यात सरकारी बंगला खाली करण्याची नोटीस, 'हे' आहे कारण

Update: 2020-07-01 16:36 GMT

आज कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा (Congress Party) यांना गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने मंत्रालयाने (Ministry of Housing and Urban Affairs) एका महिन्याच्या आत बंगला (Government Allotted Bunglow) रिकामा खाली करण्यास सांगितलं आहे. या नोटिसमध्ये प्रियंका गांधी यांना 1 ऑगस्टपर्यंत लोधी इस्टेट येथील बंगला रिकामा करण्यात यावा असं सांगण्यात आलं आहे..

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार यांनी पाठवलेल्या अधिकृत पत्रात, प्रियंका गांधी यांना आता एसपीजी सुरक्षा नसल्याने त्या राहत असलेला दिल्लीतील लोधी रोडवरील बंगला रिकामा करावा. असं म्हटलं आहे.

देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 1991 साली हत्या झाल्यानंतर गांधी कुटुंबियाला एसपीजी सुरक्षा दिली जात होती. मात्र, केंद्रीय गृह मंत्रालयाने नोव्हेंबर 2019 मध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची एसपीजी सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. सध्या गांधी कुटुंबाला झेड प्लस सुरक्षा दिली जात आहे.

प्रियंका गांधी २१ फ्रेब्रुवारी १९९७ पासून या शासकीय बंगल्यात राहत आहे. तेव्हापासून आतापर्यंत प्रियंका गांधी आणि त्यांचा परिवार या बंगल्यात राहत आहे. एसपीजी सुरक्षा व्यवस्था असलेल्या व्यक्तींना सरकारी बंगला दिला जातो. प्रियंका गांधी यांना झेड + सुरक्षा व्यवस्था असल्यानं त्यांना आता शासकीय बंगला रिकामा करावा लागणार आहे. कारण कायद्यात Z+ सुरक्षा व्यवस्था असलेल्या व्यक्तिला सरकारी निवास स्थान देण्याची तरतूद नाही.

Similar News