केंद्रीय मंत्र्यांच्या भावाला बेड मिळेना, ट्विट करून करावी लागली विनवणी

Update: 2021-04-19 11:49 GMT

देशात कोरोनामुळं वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्रीय मंत्री व्हि के सिंह यांच्या भावाला बेड मिळत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी आपल्या भावाला बेड मिळत नसल्यानं अखेर जिल्हा अधिकाऱ्यांना ट्वीट केलं आणि माझ्या भावाला वाचवा. अशी विनवणी केली.

व्ही.के.सिंह हे रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाचे राज्यमंत्री असून मोदी सरकारमध्ये दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री झाले आहेत. व्ही. के. सिंह यांच्या भावाला उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे बेड मिळत नसल्यानं त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना थेट ट्वीटर विनंती केली.




 


 काय होतं ट्वीट?

जिल्हाधिकारी साहेब माझ्या भावाला कोरोना संसर्ग झाला असून, उपचारांसाठी रूग्णालयात बेड मिळण्याची गरज आहे. सध्या या भागात कुठल्याही रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीत. कृपया माझी मदत करा.

या ट्वीटनंतर प्रशासन खडबडून जाग झालं. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ताबडतोब कॉल करून त्या व्यक्तीला बेड उपलब्ध करुन दिला. मात्र, बूंद से गयी वो हौद से नहीं आती...

एका केंद्र सरकारच्या मंत्र्यांच्या कुटुंबाला जर बेड मिळत नसेल तर सर्वसामान्याची काय अवस्था असेल असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत असताना. व्ही. के. सिंह यांनी हे ट्वीट डीलिट केलं.



 तो माझा भाऊ नये...

ज्या व्यक्तीसाठी मी ट्वीट केलं तो माझा भाऊ नव्हता. अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी मानवतेच्या भावनेतून मदत मागितली होती. त्या व्यक्तीचं आणि माझं रक्ताचं नव्हतं.

दरम्यान या सर्व प्रकरणामुळे उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाची नक्की काय परिस्थिती आहे. याची भीषणता समोर येते. महाराष्ट्रातही काल एका दिवसात 60 हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. तर 500 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Tags:    

Similar News