CBSEच्या 10 आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सवलत

Update: 2020-05-28 01:43 GMT

दोन महिन्यांपूर्वी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरात जवळपास सर्वच परीक्षा रद्द करण्यात आल्या किंवा स्थगित करण्यात आल्या आहेत. पण CBSE च्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे विद्यार्थी लॉकडाऊनमुळे आपापल्या गावी गेले आहेत, त्यांनी परीक्षा केंद्रांवर कसे यायचे, त्यांच्या प्रवासाचे काय असे प्रश्न उपस्थित केले जात होते.

यावर आता विद्यार्थी ज्या ठिकाणी आहेत त्याच जिल्ह्यातील CBSEच्या शाळांमध्ये परीक्षा देण्याची मुभा या विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे. विद्यार्थ्याना त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांची माहिती जूनच्या पहिल्या आठवड्यात दिली जाईल असेही पोखरीयाल यांनी सांगितले आहे. तसंच या दोन्ही परीक्षांचे निकाल जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत जाहीर केले जाणार आहेत.

Similar News