CBSE बोर्ड परीक्षा 2024 Live: आज इयत्ता 10वी व 12वीचे पेपर

CBSE बोर्ड परीक्षा 2024 लाइव्ह अपडेट्स: या परीक्षा सकाळी 10:30 वाजता सुरू होतील आणि 12:30 किंवा 1:30 वाजता संपतील.

Update: 2024-02-20 04:05 GMT

CBSE बोर्ड परीक्षा 2024 लाइव्ह अपडेट्स : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने (CBSE) इयत्ता 10 वी उर्दू, बंगाली, तमिळ, तेलुगु, मराठी, गुजराती, मणिपुरी आणि फ्रेंच पेपर आणि इयत्ता 12 वी अन्न उत्पादन, कार्यालयीन प्रक्रिया आणि पद्धती, डिझाइन आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयांचे पेपर घेण्यात येतील त्याचबरोबर हार्डवेअर परीक्षा, आज 20 फेब्रुवारी रोजी या परीक्षा सकाळी 10:30 वाजता सुरू होतील आणि 12:30 किंवा 1:30 वाजता संपतील.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने परीक्षार्थींना सूचना देण्यात आली आहे की, उमेदवारांनी त्यांचा गणवेश परिधान करावा आणि शाळेने दिलेली ओळखपत्रे तसेच बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र हे परीक्षा केंद्रांवर सोबत आणावे.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) इयत्ता 10वी आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) इयत्ता 12वीच्या दोन्ही अंतिम परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या आहेत. इयत्ता 10वीच्या परीक्षा 13 मार्चला संपतील आणि 12वीच्या परीक्षा 2 एप्रिलला संपणार आहेत.

Tags:    

Similar News