BIG NEWS : पक्षात राहायचं का नाही याचा विचार करावा लागेल - एकनाथ खडसे

Update: 2019-12-07 14:28 GMT

भाजप मधील काही लोकांकडून जाणीवपूर्वक अपमान करण्यात येतोय, कुठल्याही निर्णय प्रक्रियेत स्थान नाही. असा अन्याय होत असेल तर पक्षात राहायचं की नाही याचा विचार करावा लागेल. पराभवाला कारणीभूत असलेल्यांची नाव आणि पुरावे आज चंद्रकांत पाटी यांचे कडे दिले आहेत. मात्र, चंद्रकांत पाटील यांनी हे पुरावे माध्यमांसमोर मांडू नयेत. असं म्हटलं आहे.

त्यांनी परवानगी दिली तर हे पुरावे आपण नावासह पुराव्यानिशी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू असं सांगत गिरिश महाजन यांच्या सोबत भाजपला कोंडीत पकडलंय.

पंकजा मुंडे, रोहिणी खडसेंसह काही मतदार संघात भाजपच्याच उमेदवारांना काही नेत्यांनी पाडापाडी केल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केला होता. त्या नेत्यांची नावं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिले आहेत. त्यावर काल पत्रकार परिषद घेत गिरीश महाजन यांनी खडसेंना खुलं आव्हान केलं होतं की नावं जाहीर करा, यावर खडसेंनी महाजनांवर पलटवार केला असून यावेळी खडसेंनी महाजन यांनाच नाही तर भाजपलाच अडचणीत आणलं आहे.

Full View

Similar News