जिथे सरकार हात लावतं तिथे सत्यानाशच होतो – नितीन गडकरी

Update: 2019-09-02 03:03 GMT

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्याच सरकाराच्या कामकाजावर प्रश्न उभा केला आहे. नागपूरमधील एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांचं वाक्य ऐकून सगळे थक्क झाले. गडकरी म्हणाले की, मी कधीच कोणत्या प्रकल्पात सरकारची मदत घेत नाही. कारण मला माहीत आहे. जिथे सरकार हात लावतं तिथे सत्यानाशच होतो. तसंच या कार्यक्रमात बोलताना ‘विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात ही आमच्यासाठी लाजीरवीणी गोष्ट असल्याचं’ गडकरी यांनी म्हटलं आहे.

खरंतर नितीन गडकरी हे रस्ते आणि परिवहन मंत्री आहेत आणि मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांच्या विभागाच्या कामांचे कौतुक झाले होते. तरी देखील आता त्याच्या विधानातून असे दिसते की, शक्यतो सरकारी नियमांमुळे त्यांच्या विभागात किंवा त्यांना काही समस्या भेडसावत आहेत.

नितीन गडकरी यांच्या तब्येतीबाबत अधून मधून बातम्या येत असतात. नुकतंच १ ऑगस्ट ला महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी चक्कर आल्यामुळे राष्ट्रगीता दरम्यान त्यांना बसावे लागले. त्यावेळी डॉक्टरांनी "चक्कर आल्याचे" कारण मंत्र्यांनी गळ्याच्या संक्रमनासाठी घेतलेल्या एंटीबायोटिक गोळ्या असल्याचे सांगितले होते.

सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान भाजप नेत्यांनी स्टेजवर बेशुद्ध होण्याची ही पहिली वेळ नव्हती. गेल्या काही महिन्यांत अनेक सार्वजनिक कार्यक्रमात डाईबेटिस झाल्यामुळे गडकरी बेशुद्ध झाले आहेत.

Similar News