भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या कंपनीतून 400 कामगारांना बाहेरचा रस्ता

Update: 2019-09-06 02:41 GMT

आर्थिक मंदीच्या माऱ्यापुढे सध्या कोणतंच क्षेत्र वाचत नाहीए. ऑटोमाबाईल क्षेत्रापासून ते रीयल इस्टेट पर्यंत या मंदीने कंपन्यांचे अनेक युनिट बंद पडली आहेत. मंदीतून बिस्कीटाच्या कंपन्या देखील सुटल्या नाहीत. अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. एकीकडे भाजपचे कोणतेही नेते देशात मंदी असल्याचं मान्य करायला तयार नाहीत. मात्र, या मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या रीयल इस्टेट कंपनी मैक्रोटेक डेवलपर्सला या कंपनीतून 400 कर्मचाऱ्यांना काढण्यात आलं आहे. त्यातच लोढा यांच्या कंपनीवर जवळ जवळ 25,600 कोटींचं कर्ज आहे.

या संदर्भात कंपनीने या कर्मचाऱ्यांचे काम ठीक नसल्याचं सांगितलं आहे. तर दुसरीकडे जागतीक दोन व वैश्विक रेटिंग एजेंसींनी लोढा समूहाचं रेटिंग नकारात्मक दिलं आहे. या रेंटिंग संस्थामंध्ये मूडीज इन्वेस्टर्स एंड सर्विस तथा फिच रेटिंग्स एजेंन्सीचा समावेश आहे.

फीचने गेल्या 2018 – 19 लोढा समुहाच्या मैक्रोटेक कंपनीचं कर्ज 13 टक्क्यांनी वाढवून 25,640 झाल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची 400 कर्मचाऱ्यांची कपात चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या जीडीपीमध्ये घट आल्यानंतर करण्यात आली आहे.

Similar News