पाच ट्रिलियनच्या चक्करमध्ये 5 रुपयांचा पारले जी बेहाल, 10 हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड

Update: 2019-08-21 10:39 GMT

भारतातील ऑटो सेक्टरमध्ये गेल्या दोन ते तीन महिन्यात 15 हजार जणांना नोकऱ्या गमावण्याची वेळ आल्याचं ऑटो इंडस्ट्रीच्या 'एसआयएम'च्या अहवालात समोर आल्यानंतर आता इतर क्षेत्रात देखील नोकऱ्या जात असल्याचं समोर आलं आहे. देशातील बिस्किटाचं उत्पादन करणाऱ्या पारले कंपनीतील 10 हजार जणांची नोकरी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ग्राहकांकडून बिस्किटाची मागणी कमी झाल्यानं कंपनीवर ही वेळ आली आहे.

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार ‘आधी 100 रुपये प्रती किलोपेक्षा कमी बिस्किटांवर 12 टक्के कर लागायचा. आता GST लागू झाल्यानंतर बिस्किटांना 18 टक्क्याच्या स्लॅबमध्ये टाकण्यात आलं. त्यामुळे 100 रुपये प्रतिकिलो किंवा त्याहून कमी किंमतीच्या बिस्किटांवरील जीएसटी कमी करण्याची मागणी कंपनीकडून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पारले जी बिस्किटाचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात खप आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून विक्री कमी झाल्यानं कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. असं कंपनीचे कॅटेगरी हेड मयंक शाह यांनी सांगितलं.

Similar News