महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू

Update: 2024-02-25 10:46 GMT

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या, सोमवारपासून महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी २७ फेब्रुवारी रोजी लेखानुदान अर्थात अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे.

अधिवेशनाचे कामकाज

२६ फेब्रुवारी रोजी पहिल्या दिवशी २०२३-२४ या वर्षाच्या पुरवणी मागण्या मांडण्यात येतील. भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी तसेच माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडून कामकाज संपेल. दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ फेब्रुवारी रोजी सकाळी पुरवणी मागण्यांवर चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. दुपारी दोन वाजता २०२४-२५ या वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात येईल. २८ आणि २९ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्पावर चर्चा होऊन तो मंजूर केला जाईल.

अंतरीम बजेट अधिवेशन सरकार समोर महत्वाचे प्रश्न...

सरकार समोर सरकारने अनेक प्रकल्पांचा गाजावाजा करत कोटयवधी रुपयांच्या कामं मंजूर केलीत मात्र या प्रकल्पांना निधीच मिळाला नाही. कंत्राटदारांनी कामं सुरु केली मात्र सरकार कडून निधीच नाही. यामुळे राज्यातील अनेक प्रकल्पनाचे निधीअभावी कामं बंद पडली आहेत. यामुळे सरकार समोर मोठा प्रश्न आहे. निवडनुकांच वर्ष असल्याने ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारला तारेवरची कसरत करावी लागणार आहे

सरकार बदलल्यानंतर आमदारांना खूष करण्यासाठी आमदार कुठ जाऊ नये यासाठी शिंदे फडणवीस सरकारने प्रत्येक आमदारांच्या मतदार संघात कधी नव्हे एवढा कामं मंजूर करून कोट्याधीचा निधी दिला. ठेकेदारांनी कामं सुरु केली खरी मात्र निधी आला नसल्याने अनेक कंत्राटदार अडचणीत आले तर काहींनी अर्धवट कामं केली तर काही कामं थांबवली आहेत. यात बांधकाम विभाग आणि सिंचन विभागाचा सर्वाधिक मोठा निधी अडकून पडला आहे.

पीक विमा अजूनही शेतकऱ्यांना मिळाला नाही. अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन केली मात्र आज देऊ उद्या देऊ मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात काही पैसा आला नाही.

लोकसभा आचारसंहिता येत्या 15 दिवसात लागणार आणि लगेच काही महिन्यात विधानसभा निवडणुका होतील. राज्याचे अंतरीम बजेट असल्याने मोठ्या घोषणा होणार नाहीत अशी श्यक्यता आहे.

Tags:    

Similar News