NRC वरुन वाद - सरकारची तूर्तास माघार

Update: 2020-02-04 07:24 GMT

राष्ट्रीय पातळीवर NRC राबवण्याचा कोणताही विचार नसल्याचं केंद्र सरकारनं आज लोकसभेत स्पष्ट केले आहे. आज विरोधकांनी CAA, NRC च्या मुद्द्यावर लोकसभेत जोरदार घोषणाबाजी केली. एनआरसीच्या मुद्यावर केंद्र सरकारतर्फे पहिल्यांदाच संसदेत भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नित्यानंद राय यांनी आज लोकसभेत NRCच्या मुद्यावर सरकारची भूमिका मांडली. त्याआधी विरोधकांनी CAA आणि NRC तसंच भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांच्या महात्मा गांधींबद्दलच्या निषेधार्ह वक्तव्याचेही तीव्र पडसाद संसदेत उमटले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशात NRC राबवला जाणार असल्याचं याआधीच्या अधिवेशनात सांगितल्यानंतर देशभरात त्यावरुन जोरदार आंदोलनं सुरू झाली आहेत. पण त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एका जाहीरसभेत देशपातळीवर NRC राबवण्याचा विचारही सरकारनं केला नसल्याचं सांगत अमित शाह यांच्या भूमिकेला छेद दिला होता. अखेर देशभरातील तीव्र आंदोलनापुढे माघार घेत सरकारनं NRC वरुन सध्यातरी माघार घेतल्याचं दिसतंय.

Similar News