नागडे गावाजवळील पूल पाण्याखाली; येवला भारम रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत

Update: 2021-09-08 10:39 GMT

येवला तालुक्‍यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत असलेल्या बऱ्यापैकी ग्रामीण भागातील बंधारे भरल्याने येवला -भारम रोडवरील नागडे गावातील नारंदी नदीवरील पुल पाण्याखाली गेला आहे. या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

दरम्यान पाणी ओसरतच पुन्हा वाहतूक हळूहळू सुरू झाली असली तरी देखील या पुलावरून तीन ते चार फूट पाणी अजूनही वाहत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तसेच तसेच शहरातील बस स्टँड परिसरात देखील पाणी आल्याने बसस्थानक व अमरधामकडे जाणारा रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे . रस्त्यावर पाणी आल्याने बस स्थानकावर जाणाऱ्या प्रवाशांचे देखील हाल होत आहे.

तर अतिवृष्टीमुळे या भागातील शेती पिकांचे देखील मोठे नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Tags:    

Similar News