कोरोना व्हायरस च्या विरोधातील लढाईत किंग खानची कोट्यावधींची मदत...

Update: 2020-04-03 07:45 GMT

कोरोना व्हायरस ला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं हातावर पोट असणाऱ्या अनेक लोकांचं पोट सध्या लॉकडाऊन झालं आहे. अशा परिस्थीत देशातील अनेक दानशूर व्यक्तींनी हातावर पोट असणाऱ्या लोकांना मदत केली आहे. तर काहींनी पंतप्रधान साहाय्यता निधी, मुख्यमंत्री साहाय्यता निधी मध्ये आपली मदत जमा केली आहे.

मात्र, देशातील अनेक लोकांकडे कोट्यावधी रुपये असताना पैसे देत नाही. असं म्हणत अनेक नेटिझन्सनी देशातील बड्या लोकांना ट्रोल केलं आहे. बॉलिवूडचा किंग शाहरुख खान देखील यातून सुटला नाही. शाहरुखला देखील नेटिझन्स ने मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं आहे. मात्र, किंग खानने त्यांच्या विविध संस्था मार्फत अनेक लोकांची मदत केली आहे. या संदर्भात त्याने एक निवेदन सादर केलं आहे.

यामध्ये पुढील बाबींचा समावेश आहे

१) शाहरुख खान, गौरी खान, जुही चावला, जय मेहता यांच्या कोलकाता नाईट रायडर तर्फे PM CARE फंडमध्ये दान करणार.

२) शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या रेड चिलीज स्टुडीओ तर्फे मुख्यमंत्री निधीत दान करणार.

३) शाहरुख खानच्या मीर फौंडेशनतर्फे पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना 50,000 Personal Protection Equipment (PPE) देणार.

४) शाहरुखची मीर फौंडेशन 'एक साथ - दी अर्थ फौंडेशन सोबत मिळून 5500 कुटुंबाना महिनाभर अन्न पुरवणार.

५) शाहरूखची मीर फौंडेशन 'रोटी फौंडेशन' सोबत मिळून महिनाभर हातावर पोट असणाऱ्या 10,000 गरीब कारागिरांना दरदिवशी 3 लाख अन्नाची पाकिटे पुरवणार.

६) दिल्लीमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्या 2500 कारागिरांना महिन्याभराचे किराणा आणि राशन भरून देणार.

७) शाहरूखची मीर फौंडेशन उत्तरप्रदेश, दिल्ली, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तराखंड येथील ऍसिड हल्ल्यातील पिडीत व्यक्तींना महिन्याला स्टायपेंड चालू करणार.

Similar News