कंगनाचे महात्मा गांधींच्या पुण्यतिथी दिवशी नथुराम गोडसेचं समर्थन करणारे ट्विट

नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत असणारी कंगना रनौत हिने महात्मा गांधींच्या पुण्यतिथी दिवशीच त्यांचा मारेकरी नथुराम गोडसे यांचं समर्थन करणारे ट्विट केलं असून समाज माध्यमांवर तिच्यावर जोरदार टीका होत आहे.

Update: 2021-01-31 11:48 GMT

सध्या कंगना रनौत तिच्या सिनेअभिनयापेक्षा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. आता तिने पुन्हा एकदा महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिवशीच महात्मा गांधी यांच्या मारेकरी नथुराम गोडसे यांचं समर्थन करणारे ट्विट केलं आहे. सध्या समाज माध्यमांवर तिच्यावर जोरदार टीका होत आहे.

काय म्हंटल आहे तिने ट्विट मध्ये -

गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडसे यांचा फोटो टाकत "प्रत्येक गोष्टीला तीन बाजू असतात. एक तुमची.. एक माझी आणि एक खरी. चांगली कथा सांगणारा कधीही बांधिल नसतो आणि तो काही लपवतही नाही. म्हणूनच आपली पुस्तकं निरुपयोगी आहेत. त्यात फक्त दिखावाच आहे." अस तिने म्हंटले आहे.काही दिवसांपूर्वी दिल्ली येथील शेतकरी आंदोलकांना दहशतवादी म्हटलं होत.

२६ जानेवारी दिवशी देखील कंगनाने ट्विटरवर एक व्हिडिओ टाकत दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर वक्तव्य करताना कंगनाने शेतकऱ्यांना दहशतवादी आणि खलिस्तानी संबोधलं होतं. "झंड बनकर रह गए है, शर्म कर लो आज अस म्हणत ज्या प्रत्येक भारतीयाने या हिंसाचाराला सपोर्ट केला आहे, ते सर्व दहशतवादी आहेत." अस तिनं म्हटलं होत.

समाजमाध्यमांतून द्वेषपुर्वक विधानं केल्याबद्दल यापूर्वीही कंगना विरोधात विविध न्यायालयांमधे याचिका प्रलंबित आहेत.

Tags:    

Similar News