मनपा कर्मचाऱ्यांनी बायोमॅट्रीक मशिन विरोधात छेडलं आंदोलन

Update: 2020-01-03 10:40 GMT

महानगर पालिकेच्या एम पश्चिम विभाग चेंबुर येथील सफाई कर्मचाऱ्यांनी बायोमॅट्रीक मशिनमुळे होणाऱ्या वेतन कपाती विरोधात आंदोलन छेडलं आहे. संबंधित विभागातील बायोमॅट्रीक मशिनमध्ये खराबी असल्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांचं वेतन कापलं गेलं आहे. सफाई कामगार युनियनच्या कर्मचाऱ्यांनी या मशिन विरोधात मोर्चा काढुन लवकरात लवकर पगार देण्याची मागणी केली आहे.

हे ही वाचा:

“मशिनमधील बिघाडामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये कपात केली जात आहे याची वारंवार तक्रार करुनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही. मशिनमधील बिघाडीचं निवारण करण्यासाठी पत्रव्यवहारही करण्यात आले तरीही दखल घेण्यात आली नाही” अशी तक्रार मनपा कर्मचारी संतोष कांबळी यांनी व्यक्त केली आहे.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2298396330452351/?t=2

“आतापर्यंत भाजपचं राज्य होत पण आता उद्धव ठाकरेंचं राज्य आलं आहे त्यांना माझी एकचं विनंती आहे की, आम्हां कामगारांसाठी कुठल्याचं सुखसुविधा भेटत नाहीत. फक्त सफाई करा म्हणत रोज स्वच्छता मोहीम राबवतात. रोज सोसायटी मधुन टाकलेली घान उचलायला लावतात. पण आम्हाला हातमोजे, तोंडाला मास्कही वेळेवर मिळत नाही.” अशी खंत मनपा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Similar News