‘त्या’ पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी

Update: 2020-01-13 06:01 GMT

राज्याच्या राजकारणात सध्या नवीन वादाला सुरूवात झालीये. भाजप नेते जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन हा वाद सुरू झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाचीच तुलना होऊ शकत अशी प्रतिक्रिया राज्यात उमटू लागलीये. दिल्ली भाजपाच्या कार्यालयात या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. पण यानंतर भाजपावर सगळीकडून टीका होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीही आता होऊ लागली आहे. दरम्यान या पुस्तकाबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि खासदार छत्रपती संभाजी राजे यांनीही नाराजी व्यक्त करणारं ट्विट केलंय. तर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपने रायगडावर जाऊन नाक घासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची माफी मागितली पाहिजे असं म्हटलं आहे.

दरम्यान याच मुद्यावरुन छत्रपतींच्या वंशजांवर टीका केल्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या शाब्दिक युद्ध रंगलंय. संजय राऊत आणि छत्रपती संभाजी राजे यांनी ट्विटरवरुन एकमेकांवर जोरदार टीका केलीये.

Similar News