अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपची काळी दिवाळी

Update: 2021-11-01 11:31 GMT

अमरावती : राज्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, तर शेतकऱ्यांना राज्य सरकारने मदत जाहीर केली, मात्र दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर असतांना शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा केली नाही. तर महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेली मदत ही अत्यंत तोकडी असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाचे वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जनआक्रोश आंदोलन करत काळी दिवाळी साजरी करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्याबाहेर शिदोरी सोडून भाकर बेसन खात जोरदार घोषणा दिल्या,शेतकऱ्यांना दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करा,अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, संत्रा गळती होत असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत द्या, या आणि अशा इतर मागण्या आंदोलनकर्त्यांनी करत चक्क जिल्हाधिकारी कार्यालयावर झुणका भाकरचे जेवन केले. यावेळी राज्य सरकारचा निषेध भाजपाने केला. माजी कृषी मंत्री अनिल बोंडे व भाजप जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

Tags:    

Similar News