रामापेक्षा मोदी मोठे, भाजप खासदाराच्या ट्विटने नवा वाद

Update: 2020-08-05 06:00 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करण्यावरून काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. असाच एक वाद आता राममंदिराच्या भूमिपूजनावरून निर्माण झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना भाजपच्या महिला खासदार शोभा कर्नाडलजे यांनी सर्व मर्यादा पार करत रामालाही मोदींपुढे छोटे ठरवलेले आहे.

अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. पण त्याचवेळी भाजपच्या कर्नाटकमधील खासदार शोभा कर्नाडलजे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे नवीन वाद निर्माण झालेला आहे. या ट्विटमध्ये खासदार शोभा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी बाल रुपातील रामाला मंदिरात घेऊन जात आहेत, असा फोटो ट्विट केला आहे. पण त्यांनी हा फोटो ट्विट केल्यानंतर नेटकऱ्यांनी शोभा कर्नाडलजे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. नेटकऱ्यांनी नेमकी त्यांच्यावर काय टीका केलीये हे पाहूया.

Similar News