भाजपा आमदार सुनील देशमुख आणि बाळासाहेब थोरात यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

Update: 2019-08-26 11:37 GMT

अमरावतीमध्ये आज कॉंग्रेसची महापर्दाफाश यात्रा अमरावती जिल्ह्यातून सुरू होत आहे. त्या निमित्ताने काँग्रेस चे नेते अमरावतीमध्ये दाखल झाले आहे. अशातच पूर्वीचे काँग्रेसचे आणि आता सध्या भाजपमध्ये असलेले भाजप आमदार सुनील देशमुख यांनी अमरावती येथील शासकीय विश्राम गृहात भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आले आहे.

आमदार सुनील देशमुख हे भाजप चे आमदार असून ते सध्या अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे. आणि ते पूर्णपणे भाजपवासी झाले नसल्याचे बोलले जाते. मात्र त्यांच्या आज अचानक झालेल्या बंददाराआड झालेल्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

सुनील देशमुख यांनी काँग्रेसच्या काळात पालकमंत्री व आमदारकी भोगली आहे. मात्र माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांना विधानसभा निवडणूकित उमेदवारी मिळाली त्यामुळे सुनील देशमुख यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता मात्र त्यानंतर सुनिल देशमुख यांनी भाजपात प्रवेश करत गेल्या निवडणूकित विजय मिळवला होता. मात्र आता सुनील देशमुख हे भाजपात दुखी आहेत. त्यामुळे काँग्रेस विचारसरणीचे देशमुख हे पुन्हा काँग्रेस मध्ये प्रवेश करतील का हा प्रश्न या भेटीने उपस्थित होत आहे.

Similar News