आज राज्यसभेत समान नागरी कायदा विधेयक?

Update: 2020-02-11 06:51 GMT

भाजपने लोकसभा आणि राज्यसभेतील पक्षाच्या सर्व खासदारांसाठी एक व्हीप जारी केला आहे. तीन ओळींच्या या व्हीपमध्ये सर्व खासदारांना आपापल्या सभागृहात उपस्थित राहून सरकारला महत्त्वाच्या मुद्द्यावर पाठिंबा द्यावा असे आदेश देण्यात आले आहेत.

पण नेमके कारण मात्र गुलदस्त्त्यात ठेवण्यात आले आहे. आज राज्यसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बजेटवरील चर्चेला उत्तर देणार आहेत. त्याशिवाय सरकार आज एखादे महत्त्वाचे विधेयक सादर करण्याचीही शक्यता व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे आज संसदेत नेमके काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान राज्यसभेत आज एक महत्त्वाचं विधेयक सादर होण्याची शक्यता असल्याचीही चर्चा आहे. तर दुसरीकडे समान नागरी कायद्याचं विधेयक आज मांडलं जाऊ शकतं अशी शक्यता एका वृत्तसंस्थेनं व्यक्त केली आहे.

Similar News