कोरेगाव भीमा, मराठा आंदोलनातील गुन्हे मागे

Update: 2020-02-27 15:30 GMT

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण आणि मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचारप्रकरणातील काही गुन्हे मागे घेतल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरूवारी विधान परिषदेत दिली. कोरेगाव – भीमा प्रकरणातील ३४८ गुन्हे तर मराठा आरक्षण आंदोलनातील ४६० गुन्हे राज्य सरकारकडून मागे घेण्यात आले आहेत, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. तसेच या प्रकरणातील इतरही अनेक गुन्हे मागे घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी एकूण ६४९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांपैकी सध्या ३४८ गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. उर्वरित गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर, मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणातील ५४८ पैकी ४६० गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. या प्रकरणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि पोलिसांवरील हल्ल्यांसारख्या गंभीर स्वरुपाचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत, असेही देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.

Similar News