Beed | अखेर बीड जिल्हा शांत ; जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांची प्रतिक्रिया

Update: 2023-11-02 15:01 GMT

आरक्षणाच्या मुद्यावर बीड मध्ये मराठा आंदोलक आक्रमक झाले होते. महामार्गावर चक्का जाम करत वाहनांची चाळपोळ केली होती. अनेक राजकीय नेते, लोकप्रतिनिधी यांच्या घरांसह सरकारी मालमत्तेचं मोठ्याप्रमाणात नुकसान करण्यात आलं होतं. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर बीड जिल्हात मध्ये संचारबंदी कलम १४४ लागू केलं होतं. ३६ तासानंतर संचारबंदी हटवतं फक्त जमावबंदी अनिश्चित काळासाठी सुर असल्याचं जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे प्रतिक्रिया दिली आहे

दरम्यान दीपा मुधोळ- मुंडे म्हणाल्या की "जिल्ह्यात निघालेल्या शांतता रॅलीला सर्व स्तरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी दिली असून नागरिकांनी दिवाळीची खरेदी बिनदिक्कत करावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं आहे.

Tags:    

Similar News