चोकसीचा घरवापसीचा मार्ग मोकळा - सरकार

Update: 2019-06-25 08:09 GMT

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी भारताकडून बराच दबाव आणला जात आहे. चोक्सीला लवकरच भारतात आणण्यात येणार आहे.

सध्या चोक्सी अँटिग्वामध्ये वास्तव्याला आहे. लवकरच चोक्सीचं नागरिकत्व रद्द करणार असल्याचं अँटिग्वाच्या पंतप्रधान गेस्टन ब्राऊन यांनी म्हटलं आहे. अँटिग्वाच्या पंतप्रधानांनी सांगितले की चोकसीचं नागरिकत्व रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून लवकरच त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येईल. तसेच कोणत्याही प्रकारचे आरोप असलेल्या व्यक्तीला देशात थारा देणार नसल्याचं ते म्हणाले.

अँटिग्वामध्ये आता चोक्सीसमोर कोणताही कायदेशीर मार्ग शिल्लक राहिलेला नसल्याचं गेस्टन ब्राऊन यांनी म्हटलं. चोक्सीचं प्रत्यार्पण जवळपास निश्चित आहे. चोक्सीशी संबंधित संपूर्ण प्रकरण न्यायालयाच्या अखत्यारित असल्यानं अँटिग्वाकडून प्रक्रियेचं पालन केलं जाईल. या प्रकरणाची माहिती भारत सरकारला देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

Similar News