सावळजच्या बाळु लोखंडेंची खुर्ची पोहचली चक्क मँचेस्टरला

Update: 2021-09-26 02:13 GMT

आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार सूनंदन लेले हे वार्तांकनासाठी मँचेस्टर या शहरात गेले होते. तेथील एका उपहारगृहात त्यांना बाळू लोखंडे सावळज असे लिहिलेली खुर्ची दिसली. त्यांनी या लोखंडी खुर्चीचा व्हिडिओ शुट करून गंमतीने सोशल मीडियावर टाकला. मँचेस्टरच्या मार्केटमध्ये एका मराठी माणसाचं नाव पाहून मी भारावून गेलो अशी प्रतिक्रिया त्यांनी यामध्ये दिली.

यानंतर हि खुर्ची बाळू लोखंडे यांची आहे अशी माहिती त्यांना राज्यमंत्री विश्वजित कदम तसेच पाणी फाउंडेशनचे अविनाश पोळ यांनी दिली.

तासगाव तालुक्यातील सावळज येथील बाळू लोखंडे यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. त्यांनी खडतर परिस्थितीत हा व्यवसाय उभा केला.यामध्ये हळूहळू त्यांनी केटरींगचे साहित्य वाढवले. जुन्या खुर्च्यांची मागणी कमी होऊन प्लॅस्टिक खुर्च्या आल्या. त्यांनी त्यांच्या जुन्या मजबूत असलेल्या खुर्च्या भंगारात कवठेमहांकाळ येथे दहा रुपये किलो दराने विकल्या. यातील काही खुर्च्या आजही त्यांच्याकडे आहेत.परदेशी व्यावसायिकाने या खुर्च्या विकत घेतल्या. मँचेस्टर येथील व्यावसायिकाने पूर्वीच्या असणाऱ्या या खुर्च्या विकत घेतल्या आणि आपल्या रेस्टॉरंटमध्ये ठेवल्या. परंतु यावर असलेले बाळू लोखंडे हे नाव त्यांनी खोडले नाही. हि खुर्ची सूनंदन लेले यांनी पाहून हा व्हिडिओ केला. अशा प्रकारे या खुर्चीचा प्रवास सावळज ते मँचेस्टर असा झाला.

Tags:    

Similar News