बच्चू कडूंनी सरकारकडे दिव्यांगासाठी केली विद्यापीठाची मागणी

Update: 2023-02-10 06:05 GMT

दिव्यांग मंत्रालयाच्या घोषणेनंतर बच्चू कडू यांनी शिंदे-फडणवीस सरकारकडे आणखी एक मागणी केली आहे.दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालय स्थापन व्हावे, याचा पाठपुरावा बच्चू कडू यांनी केला होता. त्यानंतर सरकारने दिव्यांग मंत्रालयाची घोषणा केली. मात्र दिव्यांग मंत्रालयाच्या पाठोपाठ बच्चू कडू यांनी सरकारकडे आणखी एक मागणी केली आहे.

दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय झाल्यानंतर आता शिंदे (Shinde group) गटाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या आता दुसऱ्या मागणीला देखील मोठ यश आलं आहे. राज्यातील दिव्यांगांसाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ (Disablility university) तयार होणार आहे. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी एक समिती गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता दिव्यांगांसाठी ही दुसरी मोठी आनंदाची गोष्ट आहे. मात्र अमरावतीलाच दिव्यांग विद्यापीठ व्हावं, ही अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. जर राज्यात दिव्यांग विद्यापीठ झालं तर ते देशातील पहिलं विद्यापीठ असेल असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले.

Tags:    

Similar News