भारतात बॅकांच्या साडेतीन हजार  शाखांना टाळे!

Update: 2019-11-04 04:03 GMT

भारतात बॅकांचा वाढणारा एनपीए (NPA) त्याचप्रमाणे आर्थिक वर्षामध्ये विलीनीकरण कींवा शाखा बंद झाल्यामुळे सार्वजनीक क्षेत्रातील २६ बँका मिळून ३,४२७ शाखा बंद झाल्याचे दिसून आले. सर्वात महत्वाचं म्हणजे बंद झालेल्या एकूण शाखांपैकी ७५ टक्के शाखा स्टेट बँकेच्या आहेत.

हे ही वाचा...

राज्यात पुन्हा निवडणूका होतील – जयकुमार रावल

 

सध्या केंद्र सरकार देशातील १० सार्वजनिक क्षेत्रातील बॅकांचे विलीनीकरण करुन चार मोठ्या बॅकांच्या निर्मितीवर काम करीत असताना ही माहीती समोर आली आहे. माहिती अधिकाराच्या साहाय्याने चंद्रशेखर गौड यांना प्राप्त माहितीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील २६ बँकांच्या एकूण शाखांपैकी आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये(९०) २०१५-१६ मध्ये(१२६) २०१६-१७ मध्ये(२५३) २०१७-१८ मध्ये(२०८३) आणि २०१८-१९ मध्ये(८७५) शाखा बंद करण्यात आल्या किंवा त्यांचे अन्य बँकांमध्ये विलीनीकरण करण्यात आले.

Similar News