फडणवीसांच्या हातात बूट कशासाठी?

Update: 2020-01-28 08:29 GMT

सध्या सोशल मीडियावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. माज मंत्री पंकजा मुंडे यांनी सोमवारी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर औरंगाबादमध्ये एक दिवसाचा लाक्षणिक उपोषण केलं.

या उपोषणाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थिती लावली. पण याच कार्यक्रमातला एक फोटो सध्या व्हायरल झालाय. या फोटोमध्ये याच व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस हातात बूट घेऊन उभे असल्याचं दिसतंय. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसनं फडणवीसांना टोला लगवाला आहे.

राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणवर यांनी देवेंद्र फडणवीसांचा आपल्याच पक्षातील लोकांवर विश्वास नसल्याचा टोला लगावला आहे. फडणवीसांना चोरांच्या टोळीत बसल्यासारखं वाटत असेल म्हणून त्यांनी बूट हातात घेतले असा टोलाही त्यांनी लगवालाय.

Similar News