लॉकडाऊनमुळे ऑनलाईन व्यवहार वाढले, डिजिटल पेमेंट कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढली

Update: 2020-06-20 07:53 GMT

लॉकडाऊनच्या काळात डिजिटल व्यवहारांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आणि लोकांनी जास्तीत जास्त डिजिटल माध्यमांचा वापर करून आपले व्यवहार पूर्ण केले. पण डिजिटल व्यवहारांना भविष्यामध्ये देखील मोठी मागणी असेल हे लक्षात घेऊन आता डिजिटल प्लॅटफॉर्म कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊ लागली आहे. अशाचप्रकारे एक चाणाक्ष गुंतवणूकदार रवी अग्रवाल यांनी इन्फिबीम अव्हेन्यू या कंपनीमध्ये आपला वाटा आणखी वाढवलेला आहे. सुरुवातीच्या 5. 65% या गुंतवणुकीनंतर त्यांनी आता ही गुंतवणूक वाढवल्याने आता त्यांचा एकूण वाटा 7 11% टक्के झालेला आहे.

रवी अग्रवाल यांनी त्यांच्या परिवारातील सुरज अग्रवाल आणि इतरांसह गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आता या डिजिटल पेमेंट कंपनीमधील त्यांची गुंतवणूक 4 कोटी 71 लाख 73 हजार 974 इक्विटी शेअर्स एवढी झालेली आहे, अशी माहिती इन्फिबीमने शेअर मार्केटमध्ये सादर केलेली आहे.

हे ही वाचा

चीनी मालावर बहिष्कार टाकून नुकसान कुणाचे ? चीनचे की भारताचे?

चीनच्या आक्रमणापुढे पंतप्रधान मोदींची शरणागती – राहुल गांधी

#कोरोनाशी_लढा- शिवभोजन थाळीनं भागवली लाखो लोकांची भूक

L7 ग्रुपचे चेअरमन असलेल्या रवी अग्रवाल (ravi agrawal) यांना तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रचंड रुची आहे. त्यामुळेच ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट ही कायम त्यांच्या आवडीचे विषय राहिली आहेत . कोरोनाच्या संकटामुळे तंत्रज्ञान हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, असं रवी अग्रवाल म्हणतात . सोशल डिस्टंसिंगमुळे भविष्यात ई-कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट यांना प्रचंड मागणी असेल असेही रवी अग्रवाल यांचे म्हणणे आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रा व्यतिरिक्त रवी अग्रवाल यांची आदरातिथ्य , उत्पादन आणि कृषी तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये देखील गुंतवणूक आहे. इन्फिबीम अव्हेन्यू ही भारतातील इंटरनेट आणि ई कॉमर्स क्षेेेत्रातील अग्रेेस कंपनी आहे. गेल्याच आठवड्यात या कंपनीने कार्डपे टेक्नॉलॉजीचा 100% ताबा घेतलेला आहे.

Similar News