Home > News Update > #कोरोनाशी_लढा- शिवभोजन थाळीनं भागवली लाखो लोकांची भूक

#कोरोनाशी_लढा- शिवभोजन थाळीनं भागवली लाखो लोकांची भूक

#कोरोनाशी_लढा- शिवभोजन थाळीनं भागवली लाखो लोकांची भूक
X

राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी "शिवभोजन” थाळी योजना सुरू करण्यात आली. २६ जानेवारी २०२० पासून १८ जूनपर्यंत शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत ८८ लाख ४८ हजार ६०१ लोकांना जेवण देण्यात आले आहे.

लॉकडाऊनकाळात थाळी ५ रुपयात

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावानंतर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले, त्यानंतर राज्यात काम करणारे मजुर, स्थलांतरीत लोक, बेघर लोक तसेच बाहेरगावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना शिवभोजन थाळीने मोठा आधार दिला. लॉकडाऊन काळात या सर्वांचे जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून योजनेतील थाळीची किंमत तीन महिन्यांसाठी प्रति थाळी ५ रुपये इतकी करण्यात आली आहे. राज्यातील नागरिकांना यामुळे मोठी मदत झाली आणि प्रचंड मोठ्या संख्येने योजनेतील थाळीचा नागरिकांनी लाभ घेतला.

आतापर्यंत किती लोकांना शिवभोजन थाळीचा लाभ मिळाला?

जानेवारी - ७९ हजार ९१८

फेब्रुवारी - ४ लाख ६७ हजार ८६९

मार्च - ५ लाख ७८ हजार ०३१

एप्रिल महिन्यात २४ लाख ९९ हजार २५७

मे - ३३ लाख ८४ हजार ०४०

जून - (१८ जून पर्यंत)- १८ लाख ३९ हजार ४८६

शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागात 50 रुपये प्रती थाळी असून ग्रामीण भागात 35 रुपये इतकी आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक ग्राहकाकडून मिळालेल्या 5 रुपये एवढ्या रकमेव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून केंद्रचालकाला देण्यात येते. शहरी भागात अनुदानाची ही रक्कम ४५ तर ग्रामीण भागात ३० रुपये इतकी आहे.

Updated : 20 Jun 2020 3:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top