गरीब मुलींच्या विवाहासाठी आस्था रोटी बँकेची मदत...

Update: 2023-01-24 14:08 GMT

सोलापूर येथील सिद्धेश्वर नगर झोपडपट्टी राहणाऱ्या सौ. लक्ष्मी कुसमा यांच्या मुलीच्या विवाहाच्या बाबतच्या अडचणी संदर्भात सौ. लक्ष्मीबाई पुजारी यांनी आस्था रोटी बँकेला माहिती दिली. आणि एक मिनिटातच कुसमाची अडचण सोडवली. नेमकी कुसमाची अडचण काय होती...पाहूया विशेष रिपोर्ट...

सोलापूर येथील सिद्धेश्वर नगर झोपडपट्टी येथील कुसमा यांच्या मुलीच्या विवाहाच्या बाबतच्या अडचणी संदर्भात सौ. लक्ष्मीबाई पुजारी यांनी आस्था रोटी बँकेकडे माहिती दिली. या कुटुंबाचा उदरनिर्वाह दुसऱ्यांच्या घरातील धुणी-भांडी करून व इतर मिळेल ते काम करून आपला संसार चालवत आहेत. या कुटुंबामध्ये दोन मुली असल्यामुळे कुटुंबाचा खर्च भागवणे अवघड झाले होते. त्यातच या दोन्ही मुलींच्या लग्नाचा मोठा प्रश्न त्यांच्या आई-वडिलांसमोर निर्माण झाला होता. या दोन्ही मुलींचे लग्न कसे करायचे या चिंतेत हे कुटुंब होते. दरम्यान सौ. लक्ष्मी पुजारी यांनी या महिलेची आस्थेने चौकशी करुन रोटी बँकेला या विषयाची व त्यांच्या कार्याची माहिती दिली आणि कुसमा या कुटुंबाला मदत मिळवून दिली आणि मुलीचे लग्न पार पडले.

आस्था रोटी बँक गोरगरीब जनतेसाठी मदत करणारी संस्था आहे ही माहिती घेऊन सौ. लक्ष्मी कुसमा यांनी आस्था रोटी बँकेचे विजय छंचुरे यांची भेट घेऊन कुटुंबाची सर्व माहिती सांगितली. श्री. छंचुरे यांनी प्रत्यक्ष परिस्थिती पाहून मदत करण्याचे आश्वासन दिले. श्री. विजय छंचुरे यांनी वरील कुटुंबाची माहिती सर्व समाजातील दानशूर व मदत करणाऱ्या व्यक्तींना देवून मदतीचे आवाहन केले. प्रतिसाद म्हणून दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आश्वासन छंचुरे यांना दिले. आस्था फाउंडेशन व आस्था रोटी बँक समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने व या गरीब कुटुंबाला विवाह पार पाडण्यासाठी मदत म्हणून मणी-मंगळसूत्र, जोडवी, भांडी, चौरंग व पाट तसेच संसार उपयोगी साहित्य, चादर, शालू इत्यादी साहित्याचे कुसुमा परिवाराला देण्यात आले. याशिवाय विवाहासाठी लागणारे धान्य त्यांना देण्यात आले.

या कुटुंबातील सौ. लक्ष्मी कुसमा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आस्था रोटी बँक ही नेहमी गोरगरीब निराधार, अनाथ, अंध, अपंग यांच्या मदतीसाठी धावून येणारी संस्था आहे. आजपर्यंत या संस्थेबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल ऐकून होते आज प्रत्यक्षात अनुभव घेतला, कुसमा यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे रोटी बँक सर्व क्षेत्रात मदत करताना दिसतात. या संस्थेची आभारी आहे व या संस्थेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत आहे. असे मनोगत लक्ष्मी यांनी व्यक्त केले व आभार मानले.

Tags:    

Similar News