मुंबईला टोळधाडीचा धोका आहे का?

Update: 2020-05-28 14:27 GMT

सध्या कोरोनसोबतच टोळधाडीचं संकट महाराष्ट्रावर घोंघावतंय. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये टोळधाडीने शिरकाव केलाय. हजारो हेक्टर शेतीला याचा फटका बसत आहे. दुसरीकडे ही टोळधाड मुंबईत धडकणार असल्याच्या अफवा आज सोशल मीडियातून पसरल्या आहेत. त्यावर मुंबई महापालिकेने खुलासा करत मुंबईला टोळधडीचा कसलाही धोका नसल्याचं म्हणलंय.

कोरोनामुळे आधीच मुंबईतील सर्व यंत्रणा व्यस्त आहेत. देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबईत आहे. त्यामुळे आधीच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यात टोळधाड मुंबईत धडकणार असून मुंबईकरांनी सावधान राहावे, अशा आशयाचे काही मेसेज आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे मुंबईकरांमध्ये आणखीनच घबराट पसरली होती.

मात्र, मुंबईला टोळधाडीचा कोणताही धोका नसल्याचं मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागानं स्पष्ट केलंय. यासोबतच खोटे मेसेज फॉरव्हर्ड करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याचं प्रशासनानं सांगितलंय.

Similar News