अन्य राज्यातील महापालिका-नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी सांगलीत करणार स्वच्छता

सांगलीत पुराचे पाणी ओसारल्यानंतर महापालिकेने स्वच्छता मोहिम हाती घेतली असून 2019 प्रमाणे यंदा देखील अन्य राज्यातील महापालिका-नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सांगलीत स्वच्छतेसाठी आणण्यासाठी महापालिकांसोबत समन्वय साधण्याचे काम सुरू असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे.

Update: 2021-07-26 08:35 GMT

सांगली : सांगली शहरात पुराचे पाणी ओसरायला सुरवात होताच सांगली महापालिकेनं शहरात स्वच्छता मोहिमेला सुरूवात केली आहे. महापुरामुळे शहरात पाणी शिरल्यानं पाण्यासोबत आलेल्या घाणीमुळे कोणतीही रोगराई पसरू नये म्हणून महापालिकेने ही मोहिम हाती घेतली आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार आरोग्य यंत्रणा स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरली आहे.

सांगलीत पुराचे पाणी ओसारल्यानंतर महापालिकेने स्वच्छता मोहिम हाती घेतली असून 2019 प्रमाणे यंदा देखील अन्य राज्यातील महापालिका-नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सांगलीत स्वच्छतेसाठी आणण्यासाठी महापालिकांसोबत समन्वय साधण्याचे काम सुरू असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे.सांगलीत पुराचे पाणी ओसारल्यानंतर महापालिकेने स्वच्छता मोहिम हाती घेतली असून 2019 प्रमाणे यंदा देखील अन्य राज्यातील महापालिका-नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सांगलीत स्वच्छतेसाठी आणण्यासाठी महापालिकांसोबत समन्वय साधण्याचे काम सुरू असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे.सांगलीत पुराचे पाणी ओसारल्यानंतर महापालिकेने स्वच्छता मोहिम हाती घेतली असून 2019 प्रमाणे यंदा देखील अन्य राज्यातील महापालिका-नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सांगलीत स्वच्छतेसाठी आणण्यासाठी महापालिकांसोबत समन्वय साधण्याचे काम सुरू असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे.सांगलीत रविवारी पूर पातळी 55 फुटांवर पोहचली होती. त्यामुळं अनेक नागरी भागात पाणी शिरले होते. आज पुराचे पाणी ओसरायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. सांगली महापालिकेच्या आरोग्य यंत्रणा तसेच स्वच्छता विभागाला पाणी ओसरलेल्या भागात जाण्याने आदेश देण्यात आलेत .

पुराचे पाणी ओसरलेल्या भागात औषध फवारणी देखील केली जात आहे. सांगलीच्या स्टेशन रोड, टिम्बर एरिया आदी परिसरात स्वच्छता करण्यात आली असून , वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर तसेच याकूब मद्रासी, बंडा जोशी यांच्यासह 100 कर्मचाऱ्यांच्या टीमने स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे. या कामासाठी 20 हुन अधिक वाहणे महापालिकेकडून कार्यरत करण्यात आली आहेत.

अन्य राज्यातील नगरपालिका आणि महापालिका यांच्याशी समन्वय साधत त्यांचे स्वच्छता कर्मचाऱ्यांना देखील सांगलीत पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. 2019 ला आलेल्या महापुरावेळी देखील पुराचे पाणी ओसरल्यावर अन्य राज्यातील महानगरपालिका- नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगलीत येऊन स्वच्छता केली होती. यंदा देखील त्यांच्याशी समन्वय सुरू असल्याचे कापडणीस यांनी म्हटलं आहे.

Tags:    

Similar News