कलम ३७० रद्दचा निर्णय सुप्रीम कोर्टाने ठरवला वैध

Update: 2023-12-11 07:46 GMT

सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने ३७० कलमावर अंतिम निकाल दिला आहे. ३७० कलम हटवणे संविधानिकदृष्ट्या वैध असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. ३७० कलम नष्ट केल्याने जम्मू काश्मीर इतर भारतासोबत जोडले जाणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यामुर्तींनी यासंदर्भात निकाल देताना म्हटले आहे की आम्हाला सोलीसीटर जनरल यांनी सांगितले होते की जम्मू आणि काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल केला जाईल. लडाख हा केंद्र शासित प्रदेश राहील. निवडणूक आयोगाने जम्मू आणि काश्मीरमध्ये तातडीने विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात असे आम्ही निर्देश देतो.

भारताचे मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय किशन कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना, बीआर गवई आणि न्यायमूर्ती सुर्यकांत या न्यायाधीशांच्या संविधानपीठाने हा निर्णय दिला आहे.

Tags:    

Similar News