शिक्षक नेत्यांमध्ये स्पर्धा आहे का?

Update: 2019-08-27 17:47 GMT

विनाअनुदानित शिक्षकांचं आजाद मैदान या ठिकाणी उपोषण सुरु आहे या उपोषणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली मात्र त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये उडवाउडवीची उत्तरे दिली असे निदर्शनास आले. शिक्षक संघटनेचे नेते यांच्यामध्ये स्पर्धा आहे आणि त्यामुळे अशी आंदोलनं होत आहेत असं त्यांनी सांगितलं. मात्र एकाही शब्दाने शिक्षकांवर झालेल्या लाठीचार्जबद्दल कुठलंही सांत्वन किंवा कुठल्याही भावना व्यक्त केल्या नाही.

त्यामुळेच मॅक्स महाराष्ट्र थेट शिक्षकांपर्यंत पोहोचले. शिक्षक नेते त्यांच्याबरोबर लाठीचार्जमध्ये जखमी झालेले शिक्षक यांच्यासोबत थेट संवाद साधला आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या भाषणाबद्दल वक्ततव्याबद्दल एक-एक गुपित बाहेर येऊ लागलं. मुख्यमंत्र्यांना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यातला फरकच समजला नाही असे शिक्षकांनी सांगितले. शिक्षक संघटनेच्या नेत्यांमध्ये स्पर्धा आहे या प्रश्नाचे उत्तर मात्र येथे जमलेल्या तमाम शिक्षकांनी दिले. आमचा नेता एकच आहे कुठलीही स्पर्धा नाही असं सांगण्यात आलं. अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा या ठिकाणी उलगडा होत गेला.

9 ऑगस्ट पासून हजारो शिक्षक हे आझाद मैदानावर आपल्या शाळांना अनुदान मिळावं आणि पंधरा वर्ष एक रुपयाही न घेता काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय मिळावा यासाठी ते असा संघर्ष करत असल्याचं सांगितलं. मंत्रालयामध्ये कॅबिनेटवरती त्यांचा मुद्दा घेतला जाणार आहे आणि त्यानंतर काय निर्णय घेतला जातो याकडे आता सर्व शिक्षक आशा लावून बसलेत. या शिक्षकांसोबत मॅक्स महाराष्ट्र सदैव असेल या मुद्द्याचा मॅक्स महाराष्ट्र पाठपुरावा करेल आणि या सर्वांबाबत शिक्षकांनी देखील मॅक्स महाराष्ट्राचे मनःपूर्वक आभार मानले.

https://youtu.be/cjuuBZssPC4

 

Similar News